आपल्या जीवनातल्या बहुतांश लोकांना पडलेला एक अगदी सहज सोपा पण गोंधळात टाकणारा प्रश्न:
वजन कमी करताना नेमके काय उपयोगी पडते ?
अन्न , व्यायाम कि दोन्ही ?
काळानुसार सर्व काही बदलतं ! माणूस हळूहळू त्याचे उपजत गुण, जसे कि अभ्यास, विचार, निरीक्षण आणि याची जीवनात अंबलबजावणी करणे, वापरून आपल्या जीवनात प्रगती करत गेला. त्यातूनच औद्योगिकतेचा शोध लागला, आणि मग आपण कधी मागे वळून पहिलचं नाही. या सगळ्यांसोबत आपली जीवनशैली आणि आपण सेवन करत असलेले अन्न सुद्धा बदलत गेले, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
WHO नुसार जगातल्या एकूण लठ्ठ लोकांची संख्या गेल्या ४५ वर्षांमध्ये तिप्पट झालेली आहे. आपली सुंदरता आणि पेहराव यांच्या आहारी गेलेले लोक नकळत कृत्रिम सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या आहारी जातात. पण, तुम्हाला माहित आहे का हि औषधे किंवा प्रसाधने कशी आणि काय काम करतात? किंवा कधी कधी त्यांचा आपल्या शरीरावर अपेक्षित परिणाम का जाणवून येत नाही?
आपण ग्रहण केलेला कोणताही अन्नपदार्थ आपल्या तोंडातील लाळेशी संपर्कात आला कि त्याचे बारीक तुकडे व्हायला सुरवात होते. याचाच अर्थ असा कि अन्नाचे पचन हे आपल्या पोटातून नाही, तर तोंडातून सुरु होते. तोंडातल्या लाळेमध्ये ९८% पाणी असते. तर उरलेले २% शरीरात निर्माण होणारी द्रव्ये असतात, हिच द्रव्ये अन्नाचे बारीक तुकडे करण्यास मदत करतात.
हि द्रव्ये उत्प्रेरक म्हणून काम करून अन्नपचन क्रियेचा वेग वाढवतात. पचनक्रिया होताना अन्नाची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते.. याच ऊर्जेचा वापर आपण दैनंदिन कामे करताना करतो. यालाच 'चयापचय' असेही संबोधले जाते. म्हणूनच हि पाचक द्रव्ये शरीरासाठी अत्यंत महत्वाची असून त्यामुळे अन्नपचन वेगवान होते.
आपल्या शरीरात सिनेफ्राइन या नावाचे एक उत्प्रेरक आढळते. हे उत्प्रेरक पचनक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. नैसर्गिकरित्या सिनेफ्राइन कडू संत्र्यामध्ये किंवा इतरही अनेक जातीच्या सत्र्या मध्ये अगदी सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये हे अगदी सहजपणे वापरले जाते.
आपल्या शरीरात सिनेफ्राइन या नावाचे एक उत्प्रेरक आढळते. हे उत्प्रेरक पचनक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. नैसर्गिकरित्या सिनेफ्राइन कडू संत्र्यामध्ये किंवा इतरही अनेक जातीच्या सत्र्या मध्ये अगदी सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये हे अगदी सहजपणे वापरले जाते.
कधी कधी बाहेरून घेतलेल्या उत्प्रेरकांने सुद्धा आपल्या चयापचय प्रक्रियेमध्ये वाढ दिसून येत नाही. आपल्या शरीरात असलेल्या बचावात्मक यंत्रणा जागरूक होतात व त्यांच्यामुळे अचानक वाढलेल्या पचनाची क्रिया मंदावली जाते. अश्याप्रकारे आपल्या शरीरामध्ये संतुलन राखले जाते. आणि म्हणूनच काही लोकांमध्ये औषधं घेऊनही काहीच फरक जाणवून येत नाही किंवा कधी कधी वजन वाढतेसुद्धा!
जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा पचनक्रिया नैसर्गिकरित्या वाढून आपले शरीर चपळ बनते. याचाच अर्थ असा कि वजन कमी करताना फक्त अन्न नाही तर व्यायाम सुद्धा या प्रक्रियेचा अविभाज्य आहे. शरीराचे व मनाचे संतुलन हे अन्न व व्यायाम या दोन्हीवर अवलंबून असते. म्हणूनच नियमित व्यायाम करा, ताजे, स्वच्छ व शक्यतो सेंद्रिय अन्नाचे ग्रहण करा. अन्न निवडताना त्यामध्ये भरपूर प्रमाणात नैसर्गिक उत्प्रेरक आहेत याची खात्री करून घ्यायला विसरू नका.

लोकं लठ्ठ का होतात ?
ReplyDeleteसाखरेचा परिणाम कसा होतो ?
फळं खावीत की त्याचा ज्युस प्यावा?
साखर दारू पिण्या इतकी वाईट असं ऐकलं आहे ?
यातलं सत्य नेमकं काय आहे ?
असे अनेक प्रश्न आपला लेख वाचून पडले..
अधिक चर्चा करणारे लेख आपण लवकरच लिहाल असे अपेक्षित आहे...
हा लेख उत्तम झाला आहे..
अजून लिहीत राहा...����
हो नक्कीच.
Deleteअसेच लेख वाचून प्रतिसाद कळवत रहा.
धन्यवाद!
useful information
ReplyDeleteThank you.
DeleteKeep reading and spreading the useful information within your circle.
सुंदर लेख..
ReplyDeleteपुढील लेखाची प्रतिक्षा आहे..
धन्यवाद!
Deleteअसेच लेख वाचून प्रतिसाद कळवत रहा.
आणि लेख आपल्या संबंधित लोकांपर्यंत जरूर पोहचवा.